आताची मोठी बातमी । भाजपच्या 12 आमदार निलंबन प्रकरणी महत्वाची बातमी
BJP Suspension MLA : महाराष्ट्रातील निलंबित भाजपच्या 12 आमदारांबाबत महत्वाची बातमी.
नवी दिल्ली : BJP Suspension MLA : महाराष्ट्रातील निलंबित भाजपच्या 12 आमदारांबाबत महत्वाची बातमी. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांना मोठा झटका दिला आहे. अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. 12 आमदारांना अध्यक्षांकडे विनंती करण्याबाबत न्यायालयाने सूचना केली आहे. आता 11 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात 12 आमदारांना उपस्थित राहता येणार नाही. ( Supreme court refuses to stay suspension of BJP 12 MLA)
12 आमदारांच्या निलंबन प्रकरणी स्थगिती देण्यास नकार
इतर मागासवर्गीयांचे (OBC) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी गोंधळ घातला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवत भाजपच्या 12 आमदारांचे एका वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. निलंबनाच्या निषेधार्थ भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तसेच निलंबित 12 आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन, ही एकतर्फी कारवाई झाली असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर या 12 आमदारांनी निलंबनाच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. आज सर्वोच्च न्यायालयानेही या 12 आमदारांना कोणताही दिलासा दिलेला नाही.