नवी दिल्ली : संसदेतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत होता. त्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला सभागृहात बोलत होते. परंतू त्यांच्या मागे खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) आणि खासदार शशी थरूर (shashi tharoor) काहीतरी कुजबूज करीत होते. या व्हिडीओवर नेटकऱ्यानी असंख्य प्रतिक्रिया दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशलमीडियावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या संसदेती गप्पांचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी लोकसभेत नियम 193 अंतर्गत युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा सुरू होती. त्यावेळे नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला हे सभागृत बोलत होते. त्यांच्या मागील बाकावर बसलेल्या सुप्रिया सुळे आणि थरूर हे कुठल्यातरी विषयावर बोलत होते. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


परंतू सोशल मीडियावर तो व्हिडीओ ट्रोल करणाऱ्यांना शशी थरूर यांनी उत्तर दिले आहे.  ते म्हटले की, 'जे लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संभाषणाला ट्रोल करीत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, की त्या मला धोरणांसंदर्भातील प्रश्न विचारत होत्या, कारण बोलण्यासाठीचा पुढचा क्रमांक त्यांचाच होता. फारुख साहेबांना त्रास होऊ नये म्हणून त्या (सुप्रिया) हळू आवाजात बोलत होत्या. मी त्यांचे (सुप्रिया) बोलणे ऐकण्यासाठी खाली वाकलो होतो'.


यासोबत थरूर म्हटले की, अमर प्रेम चित्रपटातील गाण्याचा उल्लेख करीत ट्विट केले की, 'कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना. '