सूरत : सगळ्यांना चटका लावून तो गेला, तेव्हा त्याचं वय होतं अवघं अडीच वर्ष. पण जाताना तो पाच मुलांना जीवदान देऊन गेला. (In death 2.5 Yesr old boy Gifts life to Five)  सूरतमधील (Surat) एका चिमुकल्याची ही कहाणी. अडीच वर्षातच त्यांन जग सोडले. पण जाताना त्यानं पाच जणांना जीवदान दिले. जश (Jash Oza) ठरला देशातला सर्वात कमी वयाचा अवयव दाता. (A two-and-a-half year-old boy became the youngest cadaver donor)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूरतमधील (Surat) अमृता हॉस्पीटलमध्ये त्याच्या नातलांचा जीव टांगणाला लागला होता. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या टीमची प्रयत्नांची शर्थ सुरु होती. अखेर त्याची जगण्याची झुंज संपली आणि नातेवाईकांच्या भावनांचा बांध फुटला. अडीच वर्षाचा जश संजीव ओझा (Jash Oza) जगाचा निरोप घेऊन गेला.  शेजारच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडल्यामुळे जशचा ब्रेन हॅमरेज झाला. डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. अशावेळी त्याच्या कुटुंबियांनी एक अनोखा निर्णय घेतला.


अडीच वर्षांच्या चिमुकल्या जशचे हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत आणि डोळे त्यांच्या कुटुंबियांनी दान करण्याचं ठरवले. तातडीने यासाठी पावले उचलली गेली. आणि डोनाट लाइफ नावाच्या स्वंसेवी संस्थेच्या मदतीने हे अवयवदानाचं कार्य करण्यात आले. जशचे अवयव घेऊन रुग्ण वाहिकांचा ताफा विविध ठिकाणी रवाना झाला. तेव्हा संपूर्ण शहर थांबले. 


जशचं मूत्रपिंड अहमदाबादमधील दोन मुलींना दान करण्यात आले. भावनगरमधील दोन वर्षांच्या मुलाच्या शरीरात जशचं यकृत बसवण्यात आले. हृदयाचे रशियामधील चार वर्षांच्या मुलामध्ये तसेच फुफ्फुसाचं युक्रेनमधील एका मुलाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले. तर जशचे कार्निया 'लोक दृष्टी चक्षू बँकेला' दान करण्यात आले.


जशची एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली. मात्र जाताना तो पाच जणांना जीवदान देऊन गेला. त्याच्या नातेवाईकांच्या एका निर्णयामुळे इतक्या लहान वयात अवयवदान करणारा जश देशातला पहिला अवयवदाता ठरला. जश स्वत: या जगात नसला तरी त्याच्या अवयवांच्या रुपानं त्याच्या आईवडीलांसाठी आजही तो जीवंतच आहे.