नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांचं वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारताने एक चांगला नेता गमावला आहे. किडनी ट्रासप्लांटनंतर त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी म्हणून पद स्विकारण नसल्याचं दखील स्पष्ट केलं होतं. पीएम मोदींच्या पहिल्या कार्य़काळात त्यांनी परराष्ट्र मंत्रीपदाची धुरा सक्षमपणे सांभाळली. त्यांची काम करण्याची पद्धत पाहून सगळेच जण हैराण झाले. संयुक्त राष्ट्र संघात त्यांनी केलेलं भाषण हे येणारी अनेक वर्ष भारतीयांच्या मनात राहिल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा स्वराज यांचा जन्म हरियाणाच्या अम्बाला कँटमध्ये 14 फेब्रुवारी 1953 ला झाला होता. त्याचं वडील आरएसएसचे सदस्य होते. एस.एस.डी. कॉलेजमध्ये त्यांनी बीए आणि नंतर चंदीगड येथे कायद्याची पदवी घेतली. 1973 मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात प्रॅक्टीस केली. त्य़ांचा राजकीय प्रवास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) सोबत सुरु झाला. कॉलेजच्या दिवसातही त्यांची ओळख एक उत्कृष्ठ वक्ता म्हणून राहिली.


आणीबाणीच्या विरोधात त्यांनी सक्रिय प्रचार केला. जुलै 1977 मध्ये चौधरी देवीलाल यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांना स्थान मिळालं. हरियाणा सरकारमध्ये त्या शिक्षण मंत्री बनल्या. 27 वर्षात 1979 मध्ये जनता पक्षाच्या हरियाणा राज्याच्या त्या अध्यक्ष बनल्या. एप्रिल 1990 मध्ये खासदार बनल्या. 1990-96 दरमम्यान त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. 1996 मध्ये 11व्या लोकसभेच्या निवडणुकीत त्या खासदार म्हणून निवडून आल्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्या सूचना व प्रसारण मंत्री बनल्या. 12व्या लोकसभा निवडणुकीत त्या दिल्लीतून निवडून आल्या. त्यानंतर त्यांना पुन्हा सूचना व प्रसारण मंत्रालयसह दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भार मिळाला.


1998 मध्ये बनल्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री


ऑक्टोबर 1998 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळातून राजीनामा दिल्यानंतर त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर त्या पुन्हा राष्ट्रीय राजकारणात आल्या. 1999 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात बेल्लारी येथून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. 2000 मध्ये त्या पुन्हा राज्यसभेवर निवडून आल्या. मे 2004 पर्यंत त्या सरकारमध्ये राहिल्या.


एप्रिल 2009 मध्ये त्या मध्यप्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेल्या. विरोधी पक्षाच्या त्या उपनेता राहिल्या. 


विशेष माहिती


राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्ता
भाजपच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
भाजपच्या पहिल्या महिला केंद्रीय कॅबिनेट मंत्री
महासचिव, प्रवक्ता और नेता प्रतिपक्ष 
भारतीय संसदेतील एकमेव महिला खासदार ज्यांना असाधारण खासदार पुरस्कार मिळाला आहे.
उत्तर आणि दक्षिण भारतातून निवडणूक लढवणाऱ्या एकमेव भाजप नेत्या


सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील स्वराज कौशल यांच्यासोबत विवाह


१३ जुलै 1975 ला वरिष्ठ वकील स्वराज कौशल यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्या तीन वर्ष मिझोरमच्या गव्हर्नर देखील राहिल्या. मुलगी बांसुरी कौशल हिने ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीमधून पदवी आणि इनर टेम्प येथून कायद्याची बॅरिस्टर डिग्री घेतली आहे. वडिलांप्रमाणे सुप्रीम आणि हायकोर्टात त्या वकील आहेत.