नवी दिल्ली : कोजागिरी पौर्णिमेनंतर येणार्‍या चतुर्थी दिवशी 'करवाचौथ' साजरा केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात या दिवसाला विशेष महत्त्व असते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी अनेक भारतीय स्त्रिया या दिवशी निर्जळी उपवास करतात. सामान्य महिलांप्रमाणेच भारताच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील करवा चौथ साजरा केला.  


रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी काही महिला सहकार्‍यांसोबत करवा चौथची विधीवत पूजा केली. या पूजेदरम्यान सुषमा स्वराज यांनीही लाल रंगाची साडी त्यावर ओढणी आणि पारंपारिक साजशृंजार केला होता. 



 


सुषमा स्वराज आणि कौशल स्वराज हे दांम्पत्य ट्विटर फारच लोकप्रिय आहे. त्यांच्या हजरजबाबीपणाचे कौतुक होते. कौशल स्वराज हे मिझोरामचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. सध्या सुषमा स्वराजही परराष्ट्रमंत्री पद सांभाळत असल्याने त्यांची एकमेकांशी फार भेट होत नाही. सुषमा स्वराज यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच किडनी प्रत्यारोपण झाले आहे.   


सुषमा स्वराज यांच्यासोबत अनेक हिंदी मराठी सेलिब्रिटींनीदेखील करवाचौथ साजरा केला. मुंबईत ढगाळ वातावरणामुळे अनेकांना थेट चंद्रदर्शन झालेच नाही.