टेक्सासमध्ये भारतीय मुलगी बेपत्ता, सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली चिंता
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात तीन वर्षाच्या भारतीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चिंता व्यक्त केलीये.
नवी दिल्ली : अमेरिकेतील टेक्सास प्रांतात तीन वर्षाच्या भारतीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चिंता व्यक्त केलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलेले दूध प्यायली नाही म्हणून शेरिन मॅथ्यूजला तिच्या वडिलांनी घराबाहेर उभे केले होते. तेव्हापासून ती बेपत्ता आहे. शनिवारी ही घटना घडली होती.
सुषमा यांनी ट्विटरवरुन चिंता व्यक्त केलीये. मुलगी बेपत्ता झाल्याने आम्ही दु:खी आहोत. अमेरिकेत भारतीय दूतावास सक्रिय आहे आणि ते मला सतत माहिती देत आहेत, असे सुषमा यांनी ट्विटरवर म्हटलेय. बेपत्ता झालेल्या चिमुकलीला अमेरिकन दांम्पत्याने गेल्या वर्षी बिहारच्या नालंदा येथून दत्तक घेतले होते.