दिल्ली : काम, पद किंवा दर्जा यापेक्षा माणुसकीने दुसर्‍यांची कदर करा ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. याच गोष्टीचा अनुभव काल दिल्लीमध्ये आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळचे पंतप्रधान बहादुर देउबा सध्या भारत दौर्‍यावर आहेत. काल हैदराबाद हाऊसमध्ये त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसमवेत एक संयुक्त पत्रकार परिषद झाली.  यावेळेस बोलताना देउबांना खोकल्याची ढास लागलेली पाहून भारतीच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना पाणी दिले. 


देउबांना बोलताना खोकल्याचा त्रास होत होता. हळूहळू त्याचा परिणाम त्यांच्या आवाजावर दिसत होता. हे पाहून समोरच बसलेल्या सुषमा स्वराज यांनी इतर सेवकांची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच उठून देउबा यांना पाणी नेऊन दिले. 


नरेंद्र मोदींनी केली मदत 


खोकल्याचा त्रास होत असतानाही देउबा वाचन करतच राहिले. पण त्यांचा त्रास पाहून पंतप्रधान  मोदींनी त्यांच्यासमोरील बाटलीचे झाकण उघडले आणि सुषमा स्वराज याांनी बाटलीतील पाणी ग्लासात ओतून देउबांना पाणी दिले.  


देउबादेखील झाले चकीत  


वाचन करण्यात मग्न असलेल्या देउबांना सुरूवातीला सुषमाजी पाणी घेऊन उभ्या आहेत हे कळलेच नाही. थोड्या वेळाने त्यांना पाहून देउबादेखील चकीत झाले. त्यांनी उपस्थितांची माफी मागत पाण्याचा घोट घेतला.


पाण्याचा ग्लास पुन्हा जागेवर ठेवण्याच्या तयारीत असतानाच एक सहकारी  त्यांच्या मदतीला आला आणि सुषमा स्वराज पुन्हा त्यांच्या जागी बसल्या.