नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.


भारत-पाक क्रिकेटवर भूमिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान आपल्या देशातून जोपर्यंत दहशतवादाला आश्रय देईल आणि सीमेवर गोळीबार बंद करत नाही तो पर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत शेजारच्या देशांसोबत संबंध या मुद्दावर बोलतांना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.


पाक-उच्चायुक्तांपुढे प्रस्ताव


परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हेही या बैठकीत उपस्थित होते. या काळात, त्यांनी  भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्त यांची भेट घेतली. सुषमा यांनी सांगितले की, त्यांनी पाक उच्च आयुक्तापुढे असा प्रस्ताव ठेवला की, दोन्ही देशांनी मानवतेच्या आधारावर 70 वर्षे किंवा स्त्रिया किंवा मनोरुग्ण व्यक्तींची कैदेतून सुटका केली पाहिजे.


मालदीव, चीनवर चर्चा


बैठकीतील सदस्यांनी अलीकडेच मालदीव आणि चीन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी आणि दोन्ही देशांमधील वाढते संबंध आणि भारतावरील याचा प्रभाव याविषयी प्रश्न विचारले. यावेळी मंत्रालयाने म्हटलं की भारत आणि मालदीवमधील संबंध घनिष्ट आणि सौहार्दपूर्ण आहे. त्यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या संरक्षण सहकार्यावरही चर्चा केली.