मुंबई : पाकिस्तानने जाधव कुटुंबियांशी केलेला दुर्व्यवहार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत पाकिस्तानचा हा दुटप्पी चेहरा समोर आणला आहे. पाकिस्तानचं अमानवी कृत्य जगासमोर आणलं आहे. पाकिस्तानने भेटी दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला आणि आईला मंगळसूत्र, टिकली आणि बांगड्या काढण्यास सांगितलं. यावेळी कुलभूषण यांच्या आईने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सांगितलं की, या विवाहित असल्याच्या निशाणी आहेत. कृपया याला काढू नका. एवढं सांगूनही ते ऐकले नाहीत त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या समोर दोघींना विधवेच्या रुपात उभं केलं. 


सुषमा स्वराज यांनी अशाच 10 अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी समोर मांडल्या 


1) सुषमा स्वराज यांनी सांगितलं की, जशी आई कुलभूषण समोर पोहोचली तेव्हा हातात बांगड्या नव्हत्या, कपाळी टिकली नव्हती, गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. म्हणून कुलभूषणने पहिला प्रश्न केला की, बाबा कसे आहेत? कारण त्यांची वेशभूषा काही तरी वेगळं सांगत होती. 


2) भेटी अगोदर कुलभूषण जाधव यांच्या पत्नीचे शूज काढायला लावले. एवढंच काय तर ते त्यांना परत देखील केले नाहीत. पाकिस्तानने सांगितलं की, या शूजमध्ये रेकॉर्डर टेप आहे. या प्रवासा दरम्यान या दोघींनी दोन फ्लाईटमधून प्रवास केला. जर असं काही असतं तर त्यांना एअरपोर्ट चेकिंग दरम्यान ही चीप सापडली असती. जाधव यांची पत्नी सतत आपले शूज मागत राहिली मात्र त्या अधिकाऱ्यांनी ते परत केले नाहीत. 


3) भेटी दरम्यान कोणतीही माणुसकी या दोघींसोबत दाखवण्यात आली नाही. सतत या कुटुंबाला त्रास देण्यात आला त्यांच्या बोलण्याला कायम थांबवण्यात आलं. 


4) कुलभूषण जाधव यांच्या आईला मराठीत बोलू दिलं नाही. दोन पाकिस्तानी अधिकारी मिटिंगमध्ये सतत त्यांना टोकत होते. एवढंच काय तर इंटर कॉम देखील एकदा थांबवण्यात आला. 


5) आपल्या आई - पत्नीला भेटताना कुलभूषण प्रचंड दबावाखाली असल्याचं जाणवलं. अगदी सहज कळत होतं की या भेटी अगोदर त्यांना काही तरी सांगून पाठवण्यात आलं आहे. कुलभूषण पूर्ण पणे फ्रेश या भेटीत वाटत नव्हते. 


6) मानवता आणि सद्भाव सांगून करण्यात आलेल्या या भेटीत माणुसकीच नव्हती. या भेटीला अगदी पाकिस्तानच्या प्रोपोगंडा प्रमाणे स्वरूप देण्यात आले. 


7) या भेटीनंतर कारला मुद्दामून थांबवण्यात आलं. कारण मीडिया या कुटुंबाला असंख्य चुकीचे प्रश्न विचारून त्रास देऊ शकेल हा मुख्य हेतू होता. त्यांचे चुकीचे प्रश्न हे दोघींना त्रास देत होते. जाधव यांच्या पत्नीच्या शूजवरून पाकिस्तानी काही तरी गोंधळ घालतील अशी शंका आम्हाला होती. 


8) तसेच सुषमा स्वराज यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्यावरील फाशीचा निर्णय रोकण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. 


9) सोमवारी या दोघींनी पाकिस्तानमध्ये भेट घेतली. त्यावेळी पाकिस्तानने त्यांच्या भावनांचे उल्लंघन केले. 


10) कुलभूषण जाधव यांच्या पत्नीचे शूज फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.