नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरून सध्या संसदेत दावे प्रतिदावे सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संपूर्ण प्रकरणावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन देणार आहेत. आधी राज्यसभेत सकाळी 11 वाजता त्यानंतर लोकसभेत 12 वाजता त्यांचं भाषण होईल. चार दिवसांच्या सुट्टीनंतर बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होताच विरोधकांनी पाकिस्तानात जाधव कुटुंबीयांना देण्यात वागणुकीचा मुद्दा उपस्थित करत निषेध नोंदवला.


25 डिसेंबरला कुलभूषण जाधव यांची पत्नी चेतना आणि आई अवंती यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानने अत्यंत हिन दर्जाची वागणूक त्यांना दिली.