India vs Pakistan Crime News : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपारिक दुष्मनी सर्वांना माहित आहे. दोन्ही देशाची गुप्त माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेर देखील पेरले जातात. भारतात पाकिस्तानी गुप्तहेरांच्या मुसक्या आवळल्याचं अनेकदा समोर आलं होतं. अशातच आता कोलकाता इथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोलकाता पोलिसांनी संशयित पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केल्याची (Pakistani spy arrested in Kolkata) माहिती समोर आली आहे. गुप्तहेराच्या मोबाइल फोनवर फोटो, व्हिडिओ आणि ऑनलाईन चॅटच्या स्वरूपात गुप्त माहिती देखील सापडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताच्या (Kolkata Crime News) हावडा शहरातून एका 36 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आहे. एका गुप्त माहितीवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळता आल्या. हा व्यक्ती कथितपणे पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम करत होता, त्याला कोलकाता येथे अटक करण्यात आली आणि त्याच्या ताब्यातून अनेक संवेदनशील कागदपत्रे जप्त करण्यात आली, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितलं आहे.


संशयास्पद व्यक्तीला हावडा येथील त्याच्या राहत्या घरातून उचललं आणि कोलकाता येथील स्पेशल टास्क फोर्सच्या कार्यालयात काही तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक केली. आरोपी मूळचा बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील असल्याची माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या कामांमध्ये थेट सहभागी असल्याचे आढळून आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि काही ऑनलाइन चॅटच्या स्वरूपात गुप्त माहिती सापडली आहे, ही माहिती तो पाकिस्तानच्या एका संशयित गुप्तचराला पाठवत होता. अटक केल्यानंतर त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


आणखी वाचा - सावध व्हा! प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास...; PAK ची कटकारस्थानं उघड


संशयास्पद व्यक्ती हा कोलकाता येथील एका कुरिअर सेवा कंपनीत काम करत होता आणि यापूर्वी तो दिल्लीत राहत होता. आरोपी दिल्लीहून स्थलांतरित झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हावडा भागात राहत होता, असं प्राथमिक तपासात समोर आलंय. स्थानिक न्यायालयाने आरोपीला 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला आयपीसी आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टच्या (Official Secrets Act) विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे.