बानमोर, मध्यप्रदेश : दिल्लीवरून कोल्हापूरला येणाऱ्या स्वाभिमानी एक्सप्रेस मार्ग हुकल्यानं तब्बल १६० किलोमीटर अंतर चुकीच्या दिशेने धावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीहून कोल्हापूरला निघालेल्या स्वाभिमानी एक्स्प्रेसला मोठा अपघात टळल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलंय. कुठलाही सिग्नल नसताना गाडीनं तब्बल १६० किलोमीटर अंतर चुकीच्या दिशेनं प्रवास केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हणणं आहे.  


आधी निश्चित केलेल्या मार्गानं या एक्स्प्रेसचा प्रवास सुरु झाला. पण मध्येच गाडीचा मार्ग बदलल्याचंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. एक्सप्रेसचा नेहमीचा मार्ग आग्रा ते कोटा असा होता. परंतु, मार्ग बदलल्यानं आग्र्याहून एक्सप्रेस मध्यप्रदेशातील बानमोरला पोहचली.


या चुकीमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती... परंतु, सुदैवानं कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही, असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. 


दोन तासांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. सिग्नल न मिळाल्यानं एक्सप्रेसही बनमोरमध्ये रखडलेलीच आहे. 
  
हे सर्व कार्यकर्ते दिल्लीतल्या मोर्चासाठी कोल्हापूरहून विशेष गाडी आरक्षित करून मोर्चाला गेले होते.