लॉकडाऊनमुळे Swiggy कडून ११०० कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ
रेस्टाँरंट आणि हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. Swiggy आणि Zomato यासारख्या Online food Delivery App ना याचा मोठा फटका बसला आहे.
नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे Swiggy या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत विविध शहरांतील Swiggyच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात होईल. काही दिवसांपूर्वीच Zomato ने ही आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना इतरत्र नोकरी शोधण्यास सांगितले होते. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात जवळपास दोन महिने लॉकडाऊन आहे. आता लॉकडाऊनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेस्टाँरंट आणि हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. Swiggy आणि Zomato यासारख्या Online food Delivery App ना याचा मोठा फटका बसला आहे.
कोरोनामुळे जगभरातील ५० टक्के कामागारांचा रोजगार जाणार- ILO
मात्र, हा परिणाम तात्पुरताच असेल. लॉकडाऊन उठल्यानंतर ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा व्यवसाय पुन्हा जोर धरेल, असा विश्वास Swiggy च्या सहसंस्थापकांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. या संकटातून आपल्याला आणखी खंबीर होऊन बाहेर पडायचे आहे. जेणेकरून येणाऱ्या काळातील संधींचा आपल्याला फायदा उठवता येईल. सुदैवाने कोरोनाच्या संकटापूर्वी आपण गरजेपुरता भांडवल गोळा केले होते. त्यामुळे सध्या Swiggy चा कारभार शक्य त्याप्रकारे सुरु आहे. मात्र, येत्या १८ महिन्यांच्या काळात आपण दोलायमान असणारे इतर संलग्न व्यवसाय थांबवणार आहोत. याशिवाय, Swiggy ची तात्पुरती किचन्सही बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून कळवण्यात आले आहे.
मोदींच्या रणनितीला ट्रम्प यांचा धक्का, ऍपलला दिली धमकी
कोरोनामुळे कदाचित फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्स व्यवसायाला दीर्घकाळ फटका सहन करावा लागेल. कोरोनाचे संकट आणखी किती काळ राहणार, हे सांगता येत नाही. तरीही आपण हिवाळ्यापर्यंत सर्व परिस्थिती सुरळीत होईल, अशी आशा करुयात. यानंतर आपला व्यवसाय अधिक जोमाने धावेल, असा विश्वास Swiggy चे सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी व्यक्त केला.