भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये स्वाईन फ्लू च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जबलपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा बळी गेला असून या आजारामुळे सुमारे २८ जणांना मृत्यू झाला आहे. प्रदेश स्वास्थ्य विभागाचे निर्देशक डॉ. के. एल. साहू यांनी सांगितले की, "स्वाईन फ्लूमुळे राज्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर हॉस्पिलमध्ये देखील स्वाईन फ्लूच्या रुग्णांना भरती करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जबलपूरचे मुख्य स्वास्थ्य अधिकारी एम. एम. अग्रवाल यांनी सांगितले की, शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केलेल्या एका महिलेचा आणि तरुणाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जबलपूरमध्ये स्वाईन फ्लूचे २४ रुग्ण आढळले. 


हाती आलेल्या माहितीनुसार, एच १ एन १ संबंधित ५८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ११३ रुग्ण स्वाईन फ्लू ने पीडित आहेत. शासकीय रुग्णालयात देखील स्वाईन फ्लू ने ग्रस्त रुग्णांवर उपचार चालू आहेत. राज्यातील १४ जिल्हात स्वाईन फ्लू चे रुग्ण आढळून आले आहेत. 


या समस्येवर शासकीय बैठक घेऊन नियंत्रण आणण्यासाठी चर्चा केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.