मुंबई: 1 जुलैपासून अनेक नियम बदलणार आहेत. बँकेत खाती असणाऱ्यांसाठी तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहेत. पहिलं म्हणजे SBIने आपल्या ATMमधून पैसे काढण्यावर मर्यादा आणली असून त्यापुढे पैसे आकारले जाणार आहे. तर दुसरीकडे चक्क एका बँकेनं आपला IFSC कोड बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तर कॅनरा बँकेचं विलीनीकरण होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंडिकेट बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे जर तुमचं सिंडिकेट बँकेत खातं असेल आणि तुम्ही त्यातून व्यवहार करत असाल तर आता तुमचा IFSC कोड बदलणार आहे. 1 जुलैपासून हा बदलेला नवा कोड ग्राहकांना दिला जाणार आहे. सिंडिकेट आणि कॅनरा बँक एकत्र येत असल्यानं आता दोन्ही ग्राहकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची असणार आहे. 


सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांचा जुना कोड आता काम करणार नाही. त्यामुळे कदाचित पैसे पाठवणं आणि इतर व्यवहारांवर त्याचा मोठा फरक पडू शकतो. कॅनरा बँकेनं आपल्या वेबसाईटवर हा नवा कोड दिला आहे. तिथे हा नवा ISFC कोड ग्राहकांना मिळू शकणार आहे. याशिवाय तुम्ही बँकेतही चौकशी करू शकता. तर सिंडिकेटच्या ज्या शाखेत तुमचं अकाऊंट आहे तिथूनही तुम्हाला ही माहिती मिळू शकते असं सांगण्यात आलं आहे. 


दुसरा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे SBI आणि अॅक्सिस बँकने केला आहे. भारतीय स्टेट बँकेमधून १ जुलैपासून खातेदारांना महिन्यातून केवळ चार वेळा मोफत पैसे काढता येतील. त्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना 15 रूपये अतिरिक्त आकार घेतला जाणार आहे. 


याशिवाय SBIच्या प्रत्येक खातेदाराला वर्षाला फक्त १० पानी चेकबुक मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त 25 पानी चेकबुक हवं असेल तर तर 75 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क आकारण्यात येईल. तातडीनं 10 पानी  चेकबुक हवं असेल तर 50 रुपये शुल्क आकरण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांकडून चेकसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र चार मोफत व्यवहारांचं बंधन ज्येष्ठ नागरिकांनाही लागू असेल.