चेन्नई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिक तयार करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचं आज चेन्नईमध्ये निधन झालं. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९५० च्या अखेरीस त्यांनी आपले चुलत भाऊ तातिनेनी प्रकाश राव आणि कोटय्या प्रत्यागत्मा यांच्यासोबत करिअरची सुरुवात केली. १९६६ ते २००० या काळात टी रामाराव यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. 
 
टी रामा राव हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून टी रामा राव यांच्या निधनानंतर एक ट्वीट केलंय.


 



‘अनुभवी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि प्रिय मित्र टी रामा राव यांच्या निधनाबद्दल समजल्यावर खूप दुःख झालं. मला त्यांच्यासोबत ‘आखरी रास्ता’ आणि ‘संसार’मध्ये काम करण्याचं सौभाग्य लाभलं. या दुःखात मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. शांती!, असं अनुपम खेर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.