Hanuman Chalisa नं करून दाखवलं! युट्यूबवर रचला इतिहास, `हा` व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?
Hanuman Chalisan Crosses 3 Billion Views on Youtube: टी-सिरिज या (T-series Gulshan Kumar) लोकप्रिय म्युझिक कंपनीनं 2011 साली अपलोड केलेल्या हनुमान चालिसा या व्हिडीओला आत्तापर्यंत 3 बिलियन म्हणजे 300 कोटी (3 Billion) व्ह्यूज मिळाले आहे. त्यामुळे सध्या या भक्तिसंगीताची सर्वत्र तुफान चर्चा आहे.
T-Series Bhakti Sagar Hanuman Chalisa: भारतीय देवभक्ती संगीताला अजूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देवदेवतांच्या भक्तीसागरात तल्लीन होणाऱ्या भक्तमंडळींची (Bhakti Sangeet) संख्याही अफाट आहे. हनुमान चालिसा आपल्याकडे ऐकत त्यात रमणारे श्रोतेही अनेक आहेत. त्यातून सध्या एका म्युझिक कंपनीनं युट्यूबवर (T - Series) अपलोड केलेल्या हनूमान चालिसाच्या व्हिडीओला 300 कोटी व्ह्यूस मिळाले आहेत. आत्तापर्यंत युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेलेला हा व्हिडीओ (Video) आहे. सध्या हा व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे. हा व्हिडीओ युट्यूबर 10 मे 2011 रोजी अपलोड करण्यात आला होता. तुम्ही पाहू शकता की या व्हिडीओमध्ये टी-सिरिजचे संस्थापक गुलशन कुमार (Gulsan Kumar) गाताना दिसत आहेत. मुळ हनुमान चालिसा ही ज्येष्ठ गायक हरिहन (Hariharan) यांना गायली आहे. त्यांच्या मधूर आवाजातील या हनुमान चालिसाच्या व्हिडीओला 3 बिलियन म्हणजे 300 कोटी व्ह्यूस मिळाले आहेत. सध्या हा व्हिडीओ युट्यूबवर ट्रेण्डिंग आहे. (T-series video gulshan kumar singer hariharan hanuman chalisa got 3 billion views on you tube trending news in marathi)
300 करोड म्हणजे आतापर्यंत या व्हिडीओला 3 ्अब्ज व्ह्यूज (3 Billion Views) मिळाले आहेत. हरिहरन यांनी गायलेल्या या हनूमान चालिसामधून आपल्याला हनूमानाचे प्रत्यक्ष दर्शन घडते असे वाटते. हा व्हिडीओ हनुमानाच्या दिवशीही पाहिला जातो. हनुमानाचे भक्तही हा व्हिडीओ आनंदाने पाहतात आणि ऐकतात. 2021 मध्ये या व्हिडीओला 100 कोटी व्हयूज मिळाले होते आणि आता 2023 मध्ये 300 कोटी व्हू्यज मिळाले आहेत. म्हणजे फक्त दोन वर्षात या व्हिडीओच्या व्ह्यूजच्या संख्येत 200 कोटी व्ह्यूजची भर पडली आहे.
टी - सिरिजचा प्रवास
2020 मध्ये लॉकडाऊनमध्येही या व्हिडीओच्या व्ह्यूजची संख्या वाढली होती. टी-सीरिजनं आपल्या हा वर्ग चांगला तयार केला आहे. 2011 पासून 2023 पर्यंत या व्हिडीओला 300 कोटीहून जास्त लोकांनी पाहिले आहे, असं म्हणता येईल. गुलशन कुमार हे अनेकदा अशा व्हिडीओत झळकलेले पाहायला मिळाले आहेत. त्यांच्या टी-सिरिजचा विस्तार गेल्या काही वर्षात वेगानं वाढला आहे. 1997 मध्ये गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली होती.
करोडो व्ह्यूज
भक्तिमय वातावरण तयार होण्यासाठी जशी मनाची पवित्रता लागते त्याप्रमाणेच आजूबाजूचे वातावरणही संगीतमय व्हावे लागते. सध्या अशा भक्तिमय संगीताला (Sangeet in India) भारतात मोठ्या संस्खेनं प्रेक्षकवर्ग लाभला आहे. त्याचेच हे एक उदाहरण म्हणता येईल.