नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचं संकट पसरवणाऱ्या ४०० विदेशी जमातींविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालीय. कोर्टातून त्यांना एका दिवसाची शिक्षा सोबतच पाच ते दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आलायं. दिल्लीमध्ये एकूण ९५० विदेशी जमातींना पकडलं गेलं. तर उरलेल्या १५५० जमातींवर कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्रालयाने सर्व विदेशी जमातींच्या भारतात येण्यावर दहा वर्षांची बंदी घातलीय. या जमाती टुरिस्ट व्हिसावर अवैधरित्या भारतात येऊन चुकीच्या पद्धतीने धर्माचा प्रचार करत असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. 


हजरत निजामुद्दीन इथल्या तबिलीगी जमातीने १३ ते १५ मार्च दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये १५ हजारहून विेदेशी नागरिक सहभागी झाले होते. यातील बरेचजण आपल्या देशात परतले. पण लॉकडाऊनमुळे २५०० जण इथेच अडकून राहीले.  देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना फैलाव झाला. निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. 



दिल्लीसह इतर १६ राज्यांमधून १५५० हून अधिक विदेशी जमातींना पकडण्यात आलं.३६ देशांतील २५०० विदेशी जमातींविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लॉकडाऊन संपल्यावर गेल्या महिन्यात यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं.


या कार्यक्रमाने तर अनेकांना कोरोना झाल्याचे पुढे आले. तर काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. निझामुद्दीन भागातल्या तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात देशभरातून जवळपास १८३० जण सहभागी झाले होते.