Taj Mahal Name Change: जगभरात ख्याती असणाऱ्या आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रा येथील ताजमहालाचं (Taj Mahal) नाव बदलण्याची मागणी पुन्हा डोकं वर काढू लागली आहे. स्थानिक भाजप नेत्यानं ही मागणी केली आहे. सदर मागणीवर आज आगरा नगर निगम येथे प्रस्ताव मांडला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते शोभाराम राठोड यांनी ताजमहालचं नाव बदलून ते तेजोमहालय (tejo mahalaya) असं करावं ही मागणी उचलून धरली आहे. राठोड यांच्या माहितीनुसार गेल्या 4 वर्षांमध्ये जवळपास 80 रस्ते आणि चौकांची नावं बदलण्यात आली आहेत. राठोड ज्या भागातील नेते आहेत त्याच प्रभागात ताजमहालही येतो. 


ताजमहालाच्या भींतीवर कमळ आणि तत्सम बरेच असे घटक दिसले आहेत जे हिंदू धर्माचं प्रतीक आहेत, असं म्हणत त्यांनी ही मागणी केली आहे. (National News)


वाचा : ...जेव्हा बिग बी मराठमोळ्या कलाकाराचे पाय धरतात; तो क्षण पुन्हा होणे नाही 


 


काय आहे नेमकं प्रकरण? 
ताजमहलचं नाव बदलण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बऱ्याचदा असे दावे करण्यात आले की ताजमहाल ज्या ठिकाणी आहे तेथे पूर्वी एक शंकराचं मंदिर होतं. 1212 ईसवीसम मध्ये परमाद्देव यांनी तिथं तेजो महालय बनवून घेतलं होतं. ताजमहालात 22 खोल्या सुस्थितीत आहेत. याशिवाय असंही म्हटलं जातं की त्याच्या आजुबाजूला हिंदू स्थापत्यशास्त्राची उदाहरणं देणारं बांधकाम आढळतं. अनेकजण दावा करतात की, ताजमहालवर असणाऱ्या जाळीमध्ये 108 कलशही आहेत. 


आता मुद्दा असा ताजमहालविषयी केले जाणारे दावे पाहता खरंच त्याचं नाव बदललं जाणार?