...जेव्हा बिग बी मराठमोळ्या कलाकाराचे पाय धरतात; तो क्षण पुन्हा होणे नाही

फक्त ते बोलत होते आणि...   

Updated: Aug 31, 2022, 01:47 PM IST
...जेव्हा बिग बी मराठमोळ्या कलाकाराचे पाय धरतात; तो क्षण पुन्हा होणे नाही  title=
Marathi Actor samir choughule left amazed of Bollywood Actor Amitabh bachchans nature

Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन... या नावापुढे सर्वकाही संपतं, असं म्हणायला हरत नाही. कलाजगतामध्ये अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या या अभिनेत्याची भेट घेण्याची अनेकांचीच इच्छा. सर्वांनाच ते शक्य होतं असं नाही. पण, ज्यांना ही संधी मिळते त्यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांची भेट ही आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरतो.

असाच क्षण आला होता, 'हास्यजत्रा' (Hasyajatra) फेम अभिनेते समीर चौघुले यांच्या आयुष्यात. या क्षणाला साधारण वर्षाहून अधिक काळ लोटला असेल. पण, ती आठवण काही मागे पडलेली नाही. हा तोच क्षण होता जेव्हा विनोदी फटकेबाजी करणाऱ्या समीर चौघुले यांच्या कलेपुढे खुद्द अमिताभ बच्चन नतमस्तक झाले होते. (Marathi Actor sameer choughule left amazed of Bollywood Actor Amitabh bachchans nature )

थोडं मागे वळून पाहिलं, तर समीर चौघुले यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर बिग बींच्या भेटीचे क्षण पाहायला मिळतात. 

चौघुलेंनी पोस्टमध्ये काय लिहिलं? (Samir choughule instagram)
तो क्षण...आयुष्यभर काळजाच्या कुपीत साठवून ठेवण्याचा....मेंदूत त्या क्षणाची पर्मनंट “एफडी” करून ठेवण्याचा...खूप वेळ भारावून जाण्याचा..तो क्षण आपल्या आयुष्यात एकदा तरी येतोच हे काल सिद्ध झालं.......काल सोनी मराठीचे हेड अजय जी भालवणकर आणि आमचे मित्र आणि सोनी मराठीचे नॉन फिक्शन हेड अमित फाळके यांच्या सहयोगामुळे आम्हा कलाकारांचे स्वप्न पूर्ण झालं.. महानायक श्री अमिताभ बच्चन यांची प्रत्यक्ष भेट झाली...आणि हि भेट आमच्या “महाराष्ट्राची हास्यजत्रे”मुळे झाली याचं आम्हाला सर्वांनाच अत्यंतिक समाधान आहे....बच्चनसर हास्यजत्रा नियमित बघतात आणि खूप एन्जोय करतात हे त्यांच्याकडून ऐकण हे केवळ स्वप्नवत होतं...बच्चनसर समोर असून हि दिसत नव्हते..कारण डोळ्यात साचलेल्या आसवांनी दृष्टीला थिजवल होतं..आसव हि वेडी ‘वाहणं’ हा गुणधर्म विसरून साचून बघत राहिली होती...पण इवलेसे कान मात्र नदीच पात्र होऊन ऐकत होते......बच्चनसर...२५ मिनिटे बोलले फक्त हास्यजत्रेबद्धल....”आप सब ये कैसे कर पाते हो?....एक मिनिटमे इतका बडा लाफ्टर क्रियेट करना,,..बहोत बढीया ...आप सब कमाल हो ” हे असले संवाद बच्चन सरांकडून ऐकण हे अविश्वसनीय नाहीय का हो?