हॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने...; कर्नाटकमधील पीडितेचा दावा
कर्नाटकातील एका हॉटेलमधील रुममध्ये काही तरुण घुसून एका मुस्लिम महिला आणि हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेमध्ये तरुणीने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानंतर कर्नाटक पोलिसांसोबतच देश हादरला आहे.
कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये मुस्लीम तरुणांनी घुसून तिथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिला आणि एका हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा घटनेत धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने नवा खुलासा केल्याने घटनेला वेगळे वळण आले आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, हॉटेलच्या बाहेर फेकल्यानंतर मुस्लिम तरुणांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. (Taken from the hotel to the forest and then taken to 3 different places alternately muslim woman Victim claim in Karnataka )
पीडित महिला म्हणाले की, हॉटेलमधून तिचे अपहरण केल्यानंतर या मुस्लिम तरुणांनी तिला बाईकवर बसवले आणि जंगलात घेऊन गेले. तेथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. महिलेने पोलिसांना सांगितलं की, सातपैकी तीन आरोपी तरुणांनी तिला बस स्टँडवर कारमध्ये टाकले. हल्लेखोरांनी या मुस्लिम महिलेला बसमध्ये बसून सिरसीला जाण्यास सांगितले होते. ही महिला त्या ठिकाणची रहिवासी आहे.
दरम्यान, हावेरीचे एसपी अंशु कुमार यांनी माहिती दिली की, 'आम्हाला बलात्काराबाबत यापूर्वी सांगण्यात आलं नव्हतं. या महिलेच्या व्हिडीओबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तातूनच आम्हाला याची माहिती समजली आहे. आम्ही संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आता पुढील तपास करतोय.' या प्रकरणातील आरोपी कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. मात्र त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही असाच गुन्हा दाखल करण्यात आला होता, असं तपासात पुढे आलं आहे.
काय होतं संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील असून 7 जानेवारी 2024 ची ही घटना आहे. एक हिंदू तरुण आणि एक मुस्लिम महिला, उत्तरा कन्नड जिल्ह्यातील रहिवासी हॉटेलच्या खोलीत थांबले असताना हा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत माहिती मिळताच अक्किलूरमधील काही मुस्लिम तरुणांनी हॉटेल गाठलं आणि हा कांड केला. या घटनेचा ते व्हिडीओही तयार करतात. ज्यामध्ये ते रूम नंबर रेकॉर्ड करतात आणि नंतर हे लोक दोघांना खोली उघडण्यास सांगत धमकावतात.
जेव्हा खोली उघडते तेव्हा हे नराधम त्या दोघांवरही हल्ला करतात. एका मुस्लिम तरुणाने महिलेला एवढी मारहाण केली की ती जमिनीवर खाली पडलेली दिसत आहे. याशिवाय हल्लेखोर तरुण मुस्लिम महिला आणि हिंदू तरुणांनाही शिवीगाळ करताना दिसत आहेत.
दरम्यान आफताब मकबूल अहमद चंदनकट्टी (24), मद्रासब मोहम्मद इसाक मंदाक्की (23) आणि समिउल्ला लल्लनवर (23) अशी हिंदू-मुस्लीम दांपत्यावर हल्ला करणाऱ्या या मुस्लिम तरुणांची नावं आहेत. या मुस्लिम तरुणांवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला, धमकावणे, दंगा करणे. अतिक्रमण करणे, एखाद्याच्या खाजगी क्षेत्रात जबरदस्तीने प्रवेश करणे आणि नुकसान करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही या प्रकरणावर टीका केलीय. ते म्हणाले की, “नैतिक पोलिसिंगबद्दल खूप बोलणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या या विशिष्ट घटनेवर गप्प का आहेत? गैरप्रकार करणारे हे अल्पसंख्याक समाजातील होते म्हणून ?
सिद्धरामय्या यांनी या घटनेवर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.