चेन्नई : तामिळनाडू सरकारने शुक्रवारी विधानसभेत आर्थिक वर्ष २०१९-२०चा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये रामेश्वरम येथे सरकारी कला आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार असून त्याला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्प सादर करताना सरकारने महसूलात तोटा कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सरकारकडून कोणत्याही नवीन करप्रणालीचा प्रस्ताव नसल्याचे सांगितले. 



राज्याला उज्ज्वल डिस्कॉम ऍश्योरेंस योजना, वेतन कायद्यामध्ये बदल आणि सरकारकडे महसूलातून जमा होणारा पैसा यामुळे सरकारी तिजोरीला कमी फटका बसण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. सरकारने अनेक विभागांसाठी विविध कार्यक्रमांची घोषणा केली आहे. यात २००० करोड रुपयांच्या एकूण पार्किंग व्यवस्थापन प्रकल्पाचाही समावेश आहे.