नवी दिल्ली: आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी काहीजण नवस बोलतात तर कुणी इतरकाही करतं. अशाच प्रकारे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक तरुण ३५०० फूट उंचावर असलेल्या मंदिराला प्रदक्षिणा घालत होता. मात्र, त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि अपघात झाला. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना तामिळनाडूतील त्रिची येथील संजीवी पेरुमल मंदिर परिसरात घडली आहे. हे मंदिर ३५०० फूट उंचावर असून प्राचीन आणि प्रसिद्ध आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घातल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी नागरिकांची भावना आहे.


त्यामुळे अनेक भक्त आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ३५०० फूट उंचावर असलेल्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात. अशाच प्रकारे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक तरुण मंदिराला प्रदक्षिणा घालत होता. मात्र, अचानक त्याचा पाय घसरतो.



प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाने मंदिराला दोन प्रदक्षिणा घातल्या होत्या. मात्र, त्यानंतरची प्रदक्षिणा घालत असताना त्याचा पाय घसरतो आणि तो ३५०० फूट खोल दरीत खाली कोसळतो. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.