धडधाकट महिला बाथटबमध्ये बुडून मरतात ?-लेखिका तस्लीमा नसरीन
श्रीदेवी मृत्यूप्रकरणी होत असलेल्या धक्कादायक खुलाशानंतर आता लेखिका तस्लीमा नसरीननेही प्रश्न उपस्थित केले आहेत.
नवी दिल्ली : श्रीदेवी मृत्यूप्रकरणी होत असलेल्या धक्कादायक खुलाशानंतर आता लेखिका तस्लीमा नसरीननेही प्रश्न उपस्थित केले आहेत.
बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे तपास अहवालात समोर आले.
रक्तात अल्कोहोल
रक्तात अल्कोहोलचे प्रमाणही सापडले. दारूच्या नशेत ती बाथटबमध्ये पडली असे म्हटले जातेय.
शनिवारी रात्री उशिरा ५४ वर्षांच्या श्रीदेवीचा मृत्यू झाला.
बाथटबमध्ये मृत्यू ?
बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीनने श्रीदेवीचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.
'धडधाकट महिलांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू होतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी या विषयावर ब्लॉग शेयर करत या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.