Tata Group चा हा स्टॉक गुंतवणूकदारांच्या रडारवर; लवकरच तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत
Stock market / share market in marathi निवडक शेअर असे आहेत की, ज्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. टाटा ग्रुपचे हे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत
मुंबई : रशिया - युक्रेन दरम्यानच्या तणावामुळे बाजारात सध्या अस्तिरतेचं वातावरण आहे. परंतू यामध्ये निवडक शेअर असे आहेत की, ज्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. टाटा ग्रुपचे हे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीची चांगली संधी उपलब्ध होत आहे. बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्सच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. त्यासोबतच ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन (JP morgan)ने या शेअरवर गुंतवणूकीसंदर्भात सल्ला दिला आहे.
टाटा मोटर्सवर ब्रोकरेज फर्मचा सल्ला ( Tata Motors )
टाटा मोटर्सच्या शेअरवर सध्या गुंतवणूकदारांची नजर आहे. आता जेपी मॉर्गननेदेखील शेअरबाबत आपला सल्ला दिला आहे. नुकतेच टाटा मोटर्सची उपकंपनी जेएलआरने NVIDIAसोबत करार केला आहे. ग्राहकांना वाहनांमध्ये नेक्स्ट-जनरेशन ऑटोमेटेड ड्रायविंग सिस्टिम आणि AI- enabled सर्विसेस देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
सेफ्टी, ऑटोमेटेड ड्रायविंग आणि पार्किंग, ड्रायवर आणि occupant मॉनिटरिंगसारख्या सुविधा सामिल होणार आहेत.
630 रुपयांचे लक्ष्य
जेपी मॉर्गनने टाटा मोटर्सच्या शेअर्ससाठी रेटिंगमध्ये सुधार केले आहे. शेअरवर 630 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले आहे. सध्याच्या किंमतीवरून 30 टक्क्यांचा परतावा अपेक्षित आहे.
टाटा ग्रुप भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या उदयोन्मुख बाजाराचे नेतृत्व करू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदार टाटा मोटर्सच्या शेअरवर लक्ष ठेवून आहेत.