tata group taj hotels : जगभारातील सर्वोत्तम हॉटेलांची यादी पाहिली, की त्यामध्ये येणारी नावं आणि त्या हॉटेलांमध्ये मिळणाऱ्या सुविधा पाहून प्रत्येकजण भारावतो. कल्पनाशक्तीला शह देणाठऱ्या संकल्पना या हॉटेलांमध्ये प्रत्यक्षात उतरवलेल्या पाहायला मिळतात. जागतिक स्तरावर असे अनेक पंचतारांकित आणि लक्झरी हॉटेल आहेत, ज्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या यादीमध्ये आता भारताच्या 'ताज' हॉटेल समुहाचाही समावेश झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वाधिक सक्षम हॉटेल ब्रँडच्या यादीत ताजचा समावेश झाला असून, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनं यासंदर्भातील माहिती जाहिर करण्यात आली आहे. Brand Finance च्या आकडेवारीवर आधारीत माहितीनुसार Top 10 Powerfull Hotels in the world च्या यादीत TAJ हॉटेल समुह अग्रस्थानी आहे, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब. 


अपमानाची ठिणगी धुमसतच होती... आज याच ताजपुढं उभं राहून जगभरातील लोक फोटो काढतात... 


Taj Hotels समुहाची सुरुवात अतिशय रंजक वळणावर झाली होती. आधुनिक भारताच्या जनकांमध्ये ज्यांची नावं घेतली जातात यामध्ये येणारं एक नाव म्हणजे, जमशेदजी टाटा. एका अपनाची व्याजासहित परतफेड करण्यासाठी त्यांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया अर्थात अपोलो बंदर इथं हे आलिशान हॉटेल उभारलं. 


टाटा समुहाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, जमशेदजी टाटा यांना एकदा त्यांच्या परदेशी मित्रानं मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलात भेटण्यासाठी बोलवलं होतं. पण, जेव्हा ते काळा घोडा इथं असणाऱ्या वॉटसन्स हॉटेलमध्ये गेले तेव्हा मात्र तिथं त्यांना अपमानाचा सामना करावा लागला होता. त्या काळातील अतिशय गाजलेलं असं हे हॉटेल असं होतं जिथं फक्त युरोपीयांनाच प्रवेश दिला जात होता. जमशेदजी जेव्हा या हॉटेलमध्ये पोहोचले होते तेव्हा, 'इथं भारतीयांना प्रवेश दिला जात नाही' असं सांगत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्या काळात होणाऱ्या वर्णभेदाचच हे उदाहरण होतं. 


हेसुद्धा वाचा : BMC मध्ये 4500 हजार कामचोर कर्मचारी? प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत 


वॉटसन्स हॉटेलमध्ये झालेला अपमान जमशेदजींच्या जिव्हारी लागला होता. त्यांनी याच शहरात एक आलिशान हॉटेल उभारण्याचं ठरवलं आणि इथंच ताज समुहाचा पाया रचला गेला. तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 16 डिसेंबर 1903 मध्ये मुंबईत ताज हॉटेल सुरु झालं होतं. त्या क्षणापासून ताज ताठ मानेनं उभं आहे ते आजच्या क्षणापर्यंत सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होत तिथंच उभं आहे. जगातील विविध देशांमध्येही ताज समुहाचे हॉटेल असून, तिथं एकाहून एक कमाल सुविधा येणाऱ्या प्रत्येकाला दिल्या जातात.