Iphone by Tata: तुम्ही आयफॉन, आयपॅड (ipad) वापरत असालच मग तुमच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. ही गुड न्यूज तुमच्यासाठीच आहे. कारण टाटा समूह लवकरच देशभरात 100 लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, अॅपल स्टोअर्ससाठी टाटाच्या मालकीच्या इन्फिनिटी रिटेलशी यासंबंधीत बोलणी सुरू आहे. इन्फिनिटी रिटेल (infinity retail) ही कंपनी भारतात क्रोमा स्टोअर चालवते व त्यात ती अग्रेसर आहे. 


काय असेल रचना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, हे स्टॉअर्स 500-600 स्क्वेअर फूटांचे आहेत. मॉल्स आणि हाय-स्ट्रीट्स याठिकाणी 500-600 चौरस फुटांचे 100 आउटलेट उघण्याची कंपनीची योजना आहे. हे थोडेसे आकारानं लहान असेल. अॅपल स्टोअर हे 1,000 चौरस फुटांपेक्षा थोडेसे जास्त असतात त्यापेक्षा या स्टोअर कमी  आहे. लहान स्टोअर्समध्ये तुम्हाला iPhones, iPads आणि घड्याळे विकत घेतलेली मिळतील तर मोठ्या स्टोअरमध्ये चांगले कॉम्यूटर्स मिळतील. भारतात सध्या जवळपास 160 Apple प्रीमियम रिसेलर्स स्टोअर्स आहेत. 


टाटा आयफोन बनवणार? 


टाटा ग्रुप Apple Inc च्या स्पलायर Wistron Corp सोबत भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचा संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. हा संयुक्त उपक्रम भारतात आयफोन असेंबल करेल. टाटांना याद्वारे तंत्रज्ञान निर्मितीमध्ये एक मोठी पावर खुली करायची आहे. जर हा करार यशस्वी झाला तर टाटा ही आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरेल. सध्या, विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन भारत आणि चीनमध्ये आयफोन तयार करत आहेत. 


आयफोनचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये आहे 


आयफोनचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये आहे. Apple त्यांच्या Foxconn, Wistron आणि Pegatron सारख्या कंत्राटी उत्पादकांना भाग पुरवते आणि नंतर ते उत्पादक ते एकत्र करून आयफोन तयार करतात. Apple ने 2017 मध्ये iPhone SE सह भारतात iPhones बनवायला सुरुवात केली.