Tata Technologies: टाटा समूहाकडून IPO येणार! कमाईची बंपर संधी...
Tata Technologies IPO : टाटा समूह हे औद्यागिक उद्योगसमूहात मोठं नावं आहे. तब्बल 19 वर्षांनंतर त्यांना एक नवा आयपीओ (IPO) आणला आहे. या आयपीओचा शेअरही खूप मोठा आहे. यातून गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी खुली आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या नव्या (Tata IPO) आयपीओबद्दल!
Tata Technologies IPO : रतन टाटा यांच्या टाटा टेक्नोलॉजीचा (Tata Technologies new IPO) नवा आयपीओ येणार आहे. यावेळी सेबी म्हणजेच सिक्यूरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) आयपीओ संदर्भात अर्ज केला आहे. त्यामुळे टाटांचा हा नवा आयपीओ (IPO) लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी (Investment) सध्या ही एक उत्तम संधी आहे. तुम्हालाही अशाचप्रकारे तडका रिटर्न (Returns) हवा असेल तर तुम्ही या आयपीओत गुंतवणूक करू शकता. तुम्हीही थोड्याच कालावधीमध्ये मालामाल होऊ शकता. 19 वर्षानंतर टाटा समूहाच्या (Tata Group) एका कंपनीनं आयपीओ आणला आहे. त्यातून हा इश्यू ऑफर फॉर सेल (Offer For Sale) आहे त्यात नवा शेअर नसेल. तेव्हा चला जाणून घेऊया या आयपीओबद्दल! (Tata Technologies to launch IPO Tata to have IPO after 2 dacades tata motors subsidity)
टाटा टेक्नोलॉजीईस लिमिटेड ही कंपनी टाटा मोटार्स लिमिटेड या कंपनीची सबसिडी (Subsidity) आहे. कंपनी आपल्याकडील 9.5 करोड समभाग (शेअर्स) विकण्याचा प्रस्ताव केला आहे. या येणाऱ्या आयपीओतून 23.6 टक्के पेड-अप शेअर कॅपिटल (Paid Up Share Capital) असेल. टाटा टेक्नोलॉजीईसची पालक कंपनी टाटा मोटर्स या आयपीओतून 8.1 करोड रूपयांचे शेअर विकणार असल्याची माहिती कळते आहे. टाटा मोटर्सशिवाय (Tata Motors) अजून दोन मोठ्या शेअरची विक्री केली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये टाटा मोटर्सच्या बोर्डानं टाटा टेकमधला काही हिस्सा विकणार असल्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. आता ते टाटा टेक्नोलॉजीईसचा शेअर विकण्यासाठी पुढे आले आहेत.
टाटा टेक्नोलॉजीईज या कंपनीविषयी -
2022 मध्ये टाटा टेक्नोलॉजीईसचा टर्नओव्हर चांगला राहिला आहे. या कंपनीनं मागच्या वर्षी 473.5 मिलियन डॉलरचा रेव्हेन्यू (Revenue) गोळा केला आहे. टाटा टेक्नोलॉजिईस ही कंपनी अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच या कंपनीद्वारे डिजिटल सेवाही उपलब्ध केल्या जातात. ज्यात ऑटोमोबाईलपासून, एरोस्पेस, इंडस्ट्रीईल हेवी मशीनरीही आहेत. टाटा मोटर्सकडे टाटा टेक्नोलॉजिस्टचा 74.47 टक्के इतका स्टेक आहे.
अजून कोणते शेअर्स आहेत मार्गावर?
अल्फा टीसीकडे (Alfa TC) 8.96 टक्के हिस्सा, टाटा कॅपिटल ग्रोथ फंडचा (Tata Capital Growth Fund) 4.48 टक्के हिस्सा आहे. 2004 साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसचा (TCS) आयपीओ आला होता. टाटा समूहाला दोन दशकानंतर आयपीओ आणण्याची संधी मिळते आहे. टाटा समुहाची धुरा सध्या एन. चंद्रशेखरन यांच्या हाती आहे. त्यांच्या काळात हा नवा आयपीओ आहे. 2023 ते 2024 च्या काळात हा आयपीओ लॉन्च होऊ शकतो. तुम्हाला या आयपीओसाठी थोडी वाटही पाहावी लागू शकते तेव्हा त्याच्यासाठी या आयपीओवर नीट अपडेट ठेवा.