मुंबई : अरबी समुद्रातील तौत्के (Tauktae) चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना महत्वाचे माहिती दिली आहे. मुंबईत समुद्रकिनारी राहणाऱ्यांना लोकांना सर्तकतेचा इशारा दिलाय.सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असल्याचे ते म्हणाले. याचा तडाखा मुंबईला बसणार नसल्याचे सांगितलं जातंय. चौपाट्यांवर जीव रक्षक पथके तैनात केली असल्याचे त्या म्हणाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळाच्या पार्श्वभूमीवर मुलूंड आणि दहीसर कोविड सेंटरमधून रूग्णांना दुसऱ्या रूग्णालयांत हलवले जात असल्याची माहिती महापौरांनी दिली. 



कोवीड सेंटरच्या आजूबाजूच्या झाडांची छाटणी केली गेलीय. वादळाचा फटका जम्बो कोवीड सेंटरला बसल्यास कोवीड रूग्णांना त्रास होवू नये, यासाठी त्यांना हलवायचे की नाही याचा निर्णय दुपारपर्यंत होईल असे महापौर म्हणाले. वादळाची तीव्रता पाहून हा निर्णय घेत असल्याचे त्या म्हणाल्या.



मुख्यमंत्र्यांचे आदेश 


किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सूचना प्रशासनास दिल्या आहे. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे आणि मनुष्यबळ तसेच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असेही मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.


लक्षद्वीपच्या (Lakshadweep) समुद्रात तयार झालला कमी दाबाचे पट्टा अधिक सक्रीय होणार असून त्यामुळे चक्रीवादळामध्ये  (Cyclone) बदलले जाऊ शकते. चक्रीवादळाची स्थिती शनिवार  15 मे ते आगामी मंगळवार 18 तारखेदरम्यान राहणार आहे. गुजरातशिवाय रत्नागिरी, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राजधानी मुंबईला (Mumbai)Tauktae या चक्रीवादळाचा तडाखा (Cyclone Tauktae) बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस कोरोना लसीकरण Corona Vaccination) थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. धोक्याच्या इशाऱ्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या (BMC)अधिकाऱ्यांनी कोरोना लसीकरण अभियान पुढील दोन दिवस तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे, तशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, कुलाबा वेधशाळा अधिकारी डॉ. जयंत सरकार यांनी चक्रीवादळ बनण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे सांगितले आहे. शनिवारी सकाळी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. सध्या हे वादळ  लक्षद्विप बेटांजवळ आहे. यावेळी मुसळधार पाऊस पडेल. 15 आणि 16 मे रोजी ते गोवा, दक्षिण कोकण किनारपट्टीवर ते येईल. 18 तारखेपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जावू नये, असा इशारा दिला आहे.