टॅक्स वाचवण्याचा हिट फॉर्म्युला, हे करून होऊ शकता करोडपती
टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला जातो. पण तरीही हाती निराशा येते कारण टॅक्स तर वाचतो, मात्र एक फंड तयार होत नाही. पण हे शक्य आहे.
नवी दिल्ली : टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला जातो. पण तरीही हाती निराशा येते कारण टॅक्स तर वाचतो, मात्र एक फंड तयार होत नाही. पण हे शक्य आहे.
त्यासाठी एक हिट फॉर्म्युला आहे. ज्यामुळे तुमचा टॅक्सही वाचेल आणि तुमचा फंडही तयार होईल. इतकेच काय तर याने तुम्ही करोडपतीही व्हाल. वर्षाला २.५ उत्पन्न असलेल्यांनी यासाठी नक्कीच प्लॅनिंग केली पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो. काय आहे हा फॉर्म्युला? चला जाणून घेऊया...
एनपीएसमध्ये वर्षाला १.५ लाखांची गुंतवणूक
न्यू पेंशन सिस्टममध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्समध्ये सूट मिळते. वर्षाला १.५ लाख रूपयांपर्यंत यात गुंतवणूक करता येऊ शकते. इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन ८० सी नुसार १.५ लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास टॅक्समध्ये सूट मिळेल. या स्किममध्ये गुंतवणूक केल्यास रिटायरमेंटनंतर तुम्ही तुमच्यासाठी पेंशनही राखून ठेवू शकता. यात प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करावी लागेल.
प्रत्येक करावी लागेल गुंतवणूक
एनपीएसनुसार तुम्हाला प्रत्येक महिन्यात १० हजार रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. यात २ कोटी रूपयांचा फंड तयार करण्यासाठी मदत मिळेल. म्हणजे तुम्ही ३० वयात प्रत्येक महिन्यात १० हजार रूपये एनपीएसमध्ये गुंतवणूक कराल तर वर्षाला १ लाख २० हजार रूपयांचा फंड तयार होईल. या रकमेवर टॅक्समधून सूट मिळेल. जर एनपीएसमध्ये ही गुंतवणूक ६० वर्षांपर्यंत करत रहाल तर यावर वर्षाला १० टक्के रिटर्न मिळणार. म्हणजे ३० वर्षात तुमचा रिटायरमेंट फंड २ कोती २७ लाख रूपये होणार. म्हणजे टॅक्स वाचवण्यासोबतच तुम्ही सेव्हिंगही करू शकता.
काय आवश्यक आहे?
टॅक्स वाचवण्यासाठी आणि २ कोटींपेक्षा जास्त फंड तयार करण्यासाठी तुम्हाला १० हजार रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. याचा कालावधी ३० वर्षांचा असेल. वर्षाला १० टक्के रिटर्न मिळेल आणि एकूण फंड २.२७ कोटी रूपयांचा तयार होईल.
प्रत्येक महिन्यात मिळणार पेंशन
एनपीएसनुसार रिटारमेंटवेळी एकूण फंडचा ४० टक्के भाग एन्यूटी प्लान खरेदी करण्यावर खर्च करावा लागेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या २ कोटी २७ लाख रूपयांमधून साधारण ९२ लाख रूपयांचा एन्यूटी प्लान खरेदी करावा लागेल. याने तुम्हाला प्रत्येक महिन्यात साधारण ६० हजार रूपये पेंशन मिळेल.