Taxpayers Alert! आयकर विभागाच्या (Income Tax Department)वतीने पुढील महिन्याच्या सुरूवातीला नव्या ई-फायलिंग वेब पोर्टल लॉंच करण्यात येणार आहे. नव्या पोर्टलचा वापर नियमित आयटीआर (Income Tax Return) फाइल करणे तसेच इतर टॅक्सशी संबधित कामांसाठी करण्यात येणार आहे. आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.  परंतु हे पोर्टल 1 ते 6 जून पर्यंत बंद राहणार आहे. यादरम्यान महत्वाचे काम असेल तर ते त्याआधी पूर्ण करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, नवे पोर्टल जास्त युजर फ्रेंडली असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 दिवस संबधित पोर्टल बंद
आयकर विभागाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या एका आदेशात सांगण्यात आले आहे की, जुने पोर्टल  (www.Incometaxindiaefiling.Gov.In)वरून नव्या पोर्टलवर जाण्याचे काम पूर्ण होईल आणि 7 जूनपर्यंत पोर्टल लॉंच करण्यात येईल. लॉंचची तयारी आणि मायग्रेशनशी संबधीत कामांसाठी 1 ते 6 जून पर्यंत टॅक्स पेअर्स आणि टॅक्स अधिकारी दोघांसाठी संबधित वेब पोर्टल (www.Incometaxindiaefiling.Gov.In) उपलब्ध असणार नाही.


10 जून नंतरची तारीख टाका
आदेशात अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे की, कोणत्याही तक्रारींची सुनावणी साठी 10 जून नंतरची तारीख ठरवा. तोपर्यंत टॅक्सपेअर्स नव्या सिस्टिमला अवगत होतील. 


ई-फायलिंग पोर्टलवरून काय करता येईल
ई-फाइलिंग पोर्टलच्या वापर करून टॅक्सपेअर्स आपले वयक्तिक बिजनेस कॅटेगरी चे आयटी रिटर्न फाइल करू शकतात.
याऐवजी रिफंड आणि इतर कामांसाठी आपली तक्रार टॅक्स अधिकाऱ्यांना करू शकतात.