मुंबई : (Corona) कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताना पाहून आता बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये बोलवण्यास सुरुवात केली आहे. पण, बहुतांश कंपन्या अशाही आहेत ज्यांनी अद्यापही कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मुभा दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या दिवसांमध्ये मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. देशातील प्रख्यात आयटी कंपनी  टीसीएस (Tata Consultancy Services)नंही याच महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयांमध्ये बोलण्याचा निर्णय घेतला आहे. 


सर्वांना एकाच वेळी बोलवणार नाही 
सुरुवातीच्या दिवसांमध्ये कार्यालयात सर्वच कर्मचाऱ्यांना बोलवण्यात येणार नाही. त्याऐवजी वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या 50 हजार कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन काम करणं अपेक्षित असेल. 


पाच दिवसांच्या कार्यालयीन आठवड्यामध्ये त्यांनी तीन दिवस कार्यालयात जाणं अपेक्षित असेल. तर, उरलेले दोन दिवस त्यांना घरातून काम करता येईल. हळुहळू कार्यालयात येऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल. 


2022-23 या आर्थिक वर्षासाठी टीसीएसकडून कर्मचाऱ्यांचे पगार 6 ते 8 टक्क्यांनी वाढवण्यात येतील. मागील वर्षीसुद्धा अशाच पटीनं पगारवाढ करण्यात आली होती. 


घरातून काम करण्याची मुभा आणि त्यात मिळणारी पगारवाढीची संधी पाहता टीसीएसमधील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंद आणि मोठा दिलासा पाहायला मिळत आहे.