अलीगड : बाईकवरून जाणाऱ्या दोन इसमांनी शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीसांनी गुन्हाची नोंद केली असून तपास सुरू आहे. 


धक्कादायक प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरती मित्तल असे या मृत शिक्षिकेचे नाव असून शहरातील नामांकीत शाळेत स्कूल ब्लू बर्डमध्ये त्या शिक्षिका होत्या. मुलाला घेऊन शाळेत जाणाऱ्या या शिक्षिकेवर मागून गोळी झाडण्यात आली. जखमी झालेल्या आरती मित्तलला जिल्हा मलखान सिंह रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथून उपचारासाठी जेएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.


रहस्य उलघडलेले नाही


ही घटना बन्ना देवी रेल्वे रोड येथे घडली. परंतु, या घटनेचे रहस्य अजून उलघडलेले नाही.