AI Fashion Show Video : जगातल्या दिग्गज नेत्यांनी फॅशन शोमध्ये भाग घेतला आणि रॅम्प वॉक केला तर कसे दिसतील, याची झलक AI (Artificial Intelligence) च्या मदतीने पाहायला मिळालीय. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी समोवारी सोशल मीडियावर एआय-जनरेटेड व्हिडिओ शेअर केला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच माजी राष्ट्रवदी बराक ओबामा, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमाल हॅरीस, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन या नेत्याचा वर्च्युअल फॅशन शो (AI Ramp Walk) दाखवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायकीय नेत्यांचा AI फॅशन शो
सोशल मीडिया एक्सवर एलन मस्क (Elon Musk) यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला असून याबरोबर त्यांनी एक कॅप्शनही दिला आहे. यात त्यांनी म्हटलं 'एआय फॅशन शो साठी योग्य वेळ आहे'. या व्हिडिओची सुरुवात पोप फ्रांसिस यांच्यापासून करण्यात आली आहे. पोप फ्रांसिस यांनी पांढऱ्या रंगाचा कोट आणि कमरेवर सोन्याचा बेल्ट परिधान केलेला दिसतोय रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन दिसत असून ते लुई वुइटनच्या पोशाखात दिसतायत. तर जो बायडेन यांना व्हिलचेअरवर दाखवण्यात आलं असून त्यांच्या डोळ्यावर काळा चष्मा आहे. 


AI फॅशन शोमध्ये पीएम मोदी यांचा रॅम्प वॉक
या व्हिडिओत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बहुरंगी पोषाखात दिसत आहे. त्यांच्या कपड्यांवर विविध भौमितिक नमुने आणि चिन्हे दिसत आहेत. हा एक लांब पॅचवर्क कोट आहे. पीएम मोदी यांच्या कपाळावर चंदनाचा टीळा असून डोळ्यांवर गॉगल लावण्यात आलाय. पीएम मोदी यांचं हे एआय व्हर्जन लोकांच्या चांगलंच पसंतीस पडलंय.


X वाल्या शॉट्सवर एलन मस्क
या व्हिडिओत एलन मस्क हे शॉट्सवर दिसत असून यवर X लिहिण्यात आलंय. त्यानंतर आंतरिक्ष यात्री सारखा पोशाखात ते दिसत आहेत. यावर टेस्ला का लोगो लावण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प कैदयाच्या कपड्यात दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या दोन्ही हातात हातकडी बांधण्यात आली आहे. 


किम जोंग ऊनच्या गळ्यात सोन्याचा हार
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन  बॅगी, हुडी आणि सोन्याचा हार घालून रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. अॅप्पलचे सीईओ टिम कुक गळ्यात आयपॅड घालून चालताना दिसतायत. तर चीनचे राष्ट्रपाती शी जिनपिंग यानी चमकत्या लाल रंगाचा पोषाख परिधान केला आहे. यावर रंगीत टेडी बियअरच चित्र आहे.


कॅनडाचे पीएम जस्टिनत टूडो यांना महिलेचा छोटा ड्रेसमध्ये दाखवण्यात आलंय. बराक ओबामा यांना विविध रुपात दाखवण्यात आलंय. यातल्या योद्ध्याचा व्हर्जन लोकांना चांगलंच आवडलंय.