अंगावर कुत्रा सोडला, अॅसिड फेकले अन् सर्वांसमोर विवस्त्र केले; मालकाचे मोलकरणीसोबत अमानुष कृत्य
Crime News: हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अल्पवयीन मुलीला नग्न करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Crime News in Marathi: हरियाणातील गुरुग्राम येथून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरात काम करणाऱ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत तिच्या मालकाने अमानुष कृत्य केले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर कुत्रा सोडला तसंच, तिच्या कुटुंबीताली लोकांसमोरच विवस्त्र केल्याचा संतापजनक घटना घडली आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर 57 परिसरात राहणाऱ्या ज्या कुटुंबात ती काम करते. त्या कुटुंबातील सदस्यांनी 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कथित मारहाण केली त्यानंतर तिच्यावर कुत्रा सोडला यात कुत्रा चावल्याने ती गंभीर जखमीही झाली आहे. तसंच, तिला विवस्त्रदेखील केले आहे. या घटनेचा मुलीच्या मनावर गंभीर परिणाम झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीच्या आईने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ज्या घरात मुलगी काम करते तिथली महिला सातत्याने तिला लोखंडाच्या रॉडने आणि हाथोड्याने मारहाण करत असे. तसंच, तिच्या दोन मुलांनी तिला जबरदस्ती विवस्त्र केले आणि तिचा अश्लील व्हिडिओ काढला आणि तिला स्पर्श केला. तिच्या तोंडावर पट्टी लावून एका खोलीत तिला बंद करुन ठेवले होते.
पीडित मुलीच्या आईने अन्य लोकांच्या मदतीने मुलीची सुटका केली. मुलीच्या आईने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ते मुलीला 48 तासांतून एकदाच जेवण द्यायचे व नंतर तिच्या तोडांवर चिकटपट्टी लावायचे जेणेकरुन ती आरडाओरडा करणार नाही. तसंच, मालक तिच्या हातावर अॅसिडदेखील फेकायचे. व याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचे.
पीडीत मुलगी मुळची बिहारयेथील आहे. तिच्या आईने 27 जून रोजी एका व्यक्तीच्या ओळखीने तिला हे या घरात मोलकरणीचे काम मिळवून दिले होते. त्यासाठी मुलीला त्यांच्याच घरी राहायचे होते आणि घरातील काम करायचे होते. त्याचे तिला 9 हजार रुपये मिळणार होते. मात्र, सुरुवातीच्या दोन महिनेच तिला पैसे मिळाले नंतर त्यांनी पैसे दिलेच नाहीत.
पीडित मुलीच्या आईच्या आरोपांनुसार, मी कित्येकदा तिला भेटायला गेले मात्र त्यांनी भेटून दिलेच नाही आणि फोनवरही बोलू दिले नाही. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर शशी शर्मा आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.