पाटणा : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी आपल्या वक्तव्यानं वाद ओढावून घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी एका सभेदरम्यान तेज प्रताप यादव यांनी एका कुत्र्याला 'आरएसएसचा शिपाई' असं संबोधलं... अर्थात त्यावरून सभेत एकच हास्यकल्लोळ उडाला असला तरी तेज प्रताप यादव यांच्यावर यावरून टीकाही होतेय. 


तेज प्रताप जेव्हा माईकसमोर उभे होते तेव्हा सभास्थळी उपस्थित झालेल्या एका कुत्र्यावर अचानक त्यांची नजर गेली... तेव्हा कार्यकर्त्यांकडे इशारा करत 'आरएसएसच्या या शिपायाला मैदानातून बाहेर काढा... इकडे तिकडे पळतोय... मैदानात कसा घुसला आरएसएसचा शिपाई पकडा, पकडा' असं त्यांनी माईकवर म्हटलं. 


तेज प्रताप यादव आणि वाद यांचं नातं काही नवं नाही... आता या वादावर त्यांना आरएसएसकडून काय उत्तर मिळतंय, त्याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.