नवी दिल्ली : सुपर फास्ट तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे आहे. ही रेल्वे अत्याधुनिक सुविधांनीयुक्त आहे. देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस गेल्यावर्षी २४ मे रोजी मुंबई - मडगाव (गोवा) दरम्यान चालवली गेली. आता दुसरी रेल्वे दिल्ली ते चंडीगढ चालविण्यात येणार आहे. तर तिसरी तेजस एक्स्प्रेस दिल्ली ते लखनऊ दरम्यान सुरु करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली ते चंडीगढ दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. नव्या तेजस एक्स्प्रेसमध्ये अनेस सोयी-सुविधा देण्यात आल्यात. तसेच या गाडीचे रुपडे पालटण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंजाब येथील कपूरथला कोच फॅक्टरीत तेजस एक्स्प्रेस गाडी तयार करण्यात आली आहे. ही गाडी नव्या रुपात दिसणार आहे. आकर्षक रंग आणि जास्तीच्या सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. नवी रेल्वे केसरी, पिवरळा आणि भुऱ्या रंगात सजविण्यात आलेय. तसेच गाडीत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच मदतीसाठी बोलविण्यासाठी खास बटन देण्यात आले आहे. बिझनेस क्लास सीट्स, आरामदायी आसने, सीटवर एलईडी स्क्रीन देण्यात आले.