पटना : नितीश कुमारांच्या राजीनामा नाट्यानंतर तेजस्वी यादव यांनी तातडीनं राज्यपालांची भेट घेतली. राज्यात महाआघाडीकडे बहुमत असल्याचं सांगत त्यांनी महाआघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली.


नितीश कुमारांचा शपथविधी संध्याकाळी पाच वाजता होणार होता. महाआघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी सकाळी 11 पर्यंतचीवेळ दिली होती मात्र भाजप आणि जनता दलाचे नितिश कुमारांनी तातडीनं शपथविधीची वेळ बदलून सकाळी दहाची केली. यावरुन बिहारच्या राजकारणात झालेली ही घडामोड नाट्यमय रित्या घडत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.