तेलंगणा : तेलंगणा विधानसभेत 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान झाले. या ठिकाणी सत्तेत असलेली टीआरएस, कॉंग्रेस-टीडीपी युती आणि भाजपामध्ये त्रिकोणीय सामना होतोय. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वेळे आधीच निवडणुका घेण्याचा निर्णय घेत मोठी खेळी खेळली आहे.मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राजीनामा दिल्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होत आहेत. तिथेही त्यांचा तेलंगणा राष्ट्र समिती हाच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल्समधून दिसत आहेत. एक्झिट पोलमधील आकडे खरे ठरणार की वेगळाच निकाल पुढे येणार हे बघावे लागेल.  त्यांचा हा निर्णय योग्य ? की अयोग्य ? हे थोड्या वेळातच स्पष्ट होणार आहे. 


लाईव्ह अपडेट्स 



तेलंगणात भाजपाला मोठा धक्का, TRS बहुमतापेक्षाही पुढे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तेलंगणात सत्तास्थापनेसाठी भाजपाची गरज नाही- ओवेसी 
 तेलंगणा विधानसभेचा निकाल येण्याआधीच राजकिय वातावरण तापलं आहे. ​ एक्झिट पोलचे आकडे आल्यापासूनच याला सुरूवात झाली. तेलंगणात त्रिशंकू विधानसभा येईल आणि भाजपाची भुमिका यामध्ये महत्त्वाची असेल असं भाजपातर्फे म्हटलं गेलं. तर भाजपाचा हा दावा एमआयएम नेता असुदुद्दीन ओवैसीने खोडून काढला. आपल्या संपूर्ण निकालाची प्रतिक्षा करायला हवी असं त्यांनी म्हटलं. कॉंग्रेस, टीडीपीसह इतर पक्षांच्या युतीत सहभागी होण्याबद्दल बोलणं त्यांनी यावेळी टाळलं. ​


तेलंगणामध्ये लोकांनी फोडले फटाके,  टीआरएसला बढत, जल्लोषाला सुरूवात ​



टीआरएसची जोरदार मुसंडी,  टीआरएस 87, कॉंग्रेस+ 20 आणि भाजपा 5, इतर 7​


 तेलंगणात भाजपाला जोरदार झटका, गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणतात, भाजपाचे प्रदर्शन निश्चित चांगले असेल. हे केवळ कल असून ही सुरूवात आहे. भाजपा निश्चित चांगले प्रदर्शन करेल. ​


चंद्रायन गुट्टा मतदार संघातून एमआयएमचे उमेदवार अकबरद्दीन ओवेसी विजयी...अकबरुद्दीन हे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे भाऊ​


 भाजपा 2, कॉंग्रेस+ 33 तर टीआरएस 71 आणि इतर 10 ​


 आतापर्यंत 94 जागांचे कल आले असून यामध्ये टीआरएस ला 77 जागांवर आघाडी मिळाली आहे.