आंतरजातीय विवाह केल्याने संतप्त बापाने मुलीचे कोयत्याने हात तोडले
दारूच्या नशेत मुलीचे हात कोयत्याने तोडल्याचा गंभीर प्रकार
तेलंगणा : जातीबाहेर लग्न केल्याने मुलामुलींच्या जीवावर बेतल्याच्या घटना देशभरातून समोर येत असतात. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल म्हणून वडीलांनी दारूच्या नशेत मुलीचे हात कोयत्याने तोडल्याचा गंभीर प्रकार तेलंगणामध्ये समोर आलाय. मुलीची स्थिती गंभीर असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
आरोपी वडील मनोहर चारे याला बुधवारी संध्याकाळी त्याच्या मेहुण्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आल. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. मुलीच्या आंतरजातीय विवाहामुळे तो नाराज होता. पीडित मुलगी माधवीचे 5 वर्षांपासून संदीप नावाच्या तरुणाशी प्रेमसंबध होते. त्यांनी 12 सप्टेंबरला एका मंदीरात लग्न केलं होतं.
कॅमेरात कैद
आरोपी पिता सुरूवातीपासूनच या लग्नाला विरोध करत होता. बुधवारी दुपारी आरोपीने मुलगी आणि तिच्या नवऱ्याला बोलावून घेतलं. त्यानंतर त्याने पहिला मुलावर हल्ला केला त्यानंतर तो आपल्या मुलीकडे वळला आणि कोयत्याने तिचे हात तोडले. जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. 'नाना थांबा..मला मारू नका..' असे मुलगी ओरडून सांगत होती असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. आरोपी मुलीवर अजून हल्ला करु इच्छित होता तेवढ्यात एका तरुणाने त्याला धक्का दिला. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला.