मुंबई : देशात कोरोनाचे (Coronavirus in India) संकट घोंगावत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सरकारने कोरोनाची (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध जारी केले आहेत. तर काही ठिकणी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता तेलंगणामध्ये ड्रोनचा उपयोग करुन कोरोना लस वितरणाला (Covid Vaccines) वेग देण्यासाठी केला जाईल. यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने सशर्त मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत राज्यास एक वर्षासाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.


या नियमांतर्गत दिली सवलत  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रालयाने आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, प्रयोगशाळेत लस ड्रोनद्वारे दिली जाईल. यासाठी तेलंगाना सरकारला मानवरहित विमान प्रणाली (यूएएस)  नियम-2021 मध्ये सशर्त सूट देण्यात आली आहे. या सूट अंतर्गत, ड्रोनचा उपयोग दृश्यमानतेच्या मर्यादेत प्रायोगिकरित्या लसी देण्यासाठी केला जाईल. असेही म्हटले आहे की, 'राज्य सरकारला केवळ पुढील एक वर्षासाठी किंवा पुढील आदेशापर्यंत ही सूट देण्यात आली आहे.'  भारतीय वैद्यकीय संशोधन मंत्रालयाने ड्रोनद्वारे कोरोना लस वाहतुकीवर संशोधन करण्यास परवानगी दिली होती.


मे महिन्यात अखेरीस चाचणी


ड्रोनमधून लस वितरण करण्याच्या मुद्द्यावर तेलंगणा सरकारने म्हटले आहे की, 'मेडिसीन फ्रॉम स्काय'ला दृश्यमानतेच्या मर्यादेत एक वर्षासाठी संशोधन परवानगी मिळाली आहे. नागरी उड्डयन मंत्रालय आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने ड्रोन चाचणीसाठी आवश्यक मंजुरी आणि सूट मिळाली आहे.


ही मंजुरी मिळाल्यानंतर ड्रोनमधून लस पोहोचविण्याची चाचणी मे महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे. तथापि, या संदर्भात कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. सरकारला आशा आहे की ही चाचणी यशस्वी झाल्यास ड्रोनद्वारे लस देण्याच्या कामास मोठ्या प्रमाणात गती मिळू शकेल.