मुंबई : तेलंगणामध्ये लॉकडाऊन २९ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी याची घोषणा केली आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय असताना तेलंगणाने हा मोठा निर्णय घेतला आहे. देशातील तिसऱ्या टप्प्यातील लॉकड़ाऊन १७ मे पर्यंत लागू असणार आहे. त्यानंतर लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत अजून ही कोणालाच काही माहिती नाही. पण तेलंगणा चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवणारं पहिलं राज्य ठरलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री केसीआर यांनी मंगळवारीव म्हटलं की, 'तेलंगणामध्ये कोरोनाचे १०९६ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी ६२८ जण बरे झाले आहेत. मंगळवारी राज्यात कोरोनाचे ११ नवे रुग्ण वाढले. सध्या तेलंगणामध्ये कोरोनाचे ४३९ रुग्ण उपचार घेत आहेत.'



मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, नागरिकांनी ६ वाजेपर्यंत आवश्यक वस्तू खरेदी करुन पुन्हा घरात गेलं पाहिजे. संध्याकाळी ७ नंतर राज्यात कर्फ्यू असेल. जर कोणी बाहेर फिरताना आढळलं तर त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.