कर्नाटक : बंगळुरुतील एका दूरसंचार कंपनीने एका व्यक्तीचं सिम कार्ड आधारशी लिंक नसल्याने बंद केलं. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचं हे सिम कार्ड होतं, ती व्यक्ती 


मोबाईल सिमकार्ड बंद केलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्ड जारी करणारी संस्था आधार प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापकांचे मोबाईल सिमकार्ड बंद करण्यात आले आहे. दूरसंचार कंपनीने ते बंद केले आहे. प्रकल्प व्यवस्थापक प्रभाकर एचएल कर्नाटकात सेंटर फॉर ई-गव्हर्नन्ससाठी काम करतात.


सुप्रीम कोर्टाकडून 31 मार्च 2018 पर्यंतची मुदत


विशेष म्हणजे अजूनही कोणतीही कंपनी सिम कार्ड बंद करु शकत नाही. सिम कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 मार्च 2018 पर्यंतची मुदत दिली आहे. 


यावर बोलताना प्रभाकर म्हणाले, 'कंपनीने सिम कार्ड आधारशी लिंक नसल्याने बंद केलं. ओटीपीने रिव्हेरिफिकेशन केल्याचं कंपनीला सांगितलं होतं, मात्र कनेक्शन चालू ठेवण्यासाठी फिंगरप्रिंट आणि एक प्रमाणपत्र देणं गरजेचं असल्याचं कंपनीने सांगितलं.'