जम्मू-काश्मीरचा पारा शून्याहून खाली उतरला
काश्मीर खोऱ्यात आणि लडाख क्षेत्रात पारा चांगलाच खाली उतरलाय.
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात आणि लडाख क्षेत्रात पारा चांगलाच खाली उतरलाय.
राज्यात लेह सर्वाधिक थंड पडल्याची नोंद झालीय. इथं तपमान शून्यच्या खाली जात -९.४ डिग्री नोंदवण्यात आलंय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कारगिल शहरात किमान तपमान -७.० डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं.
खोऱ्याची उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगरमध्ये पारा ३ डिग्रीपर्यंत खाली गेला तर इथं किमान तपमान -१.७ डिग्री सेल्सिअस असल्याची नोंद केली गेली.
दक्षिण काश्मीरच्या काजीगुंड आणि कोकरनागचं तपमान क्रमश: -१.२ डिग्री आणि -१.६ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलंय.
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा आणि गुलमर्गमध्ये तपमान क्रमश: -२.० डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं.
वार्षिक अमरनाथ यात्रेचं बेस कॅम्प असलेल्या पहलगामचं तपमान -४.० डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. काश्मीर आणि लडाख क्षेत्रात येत्या काही दिवसांत तपमान शुष्क राहील, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.