नवी दिल्ली : तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक ऑटो रिक्षा चक्क विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा मुलांसह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४० ते ५० वर्षांच्या चार महिलांचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षा मुपकालहून मेन्दोर जात असताना हा अपघात झाला. रिक्षात एकूण १४ प्रवासी होते. यापैकी चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे.



अपघातानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. रिक्षाचा वेग अधिक असणं आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


दोन कारमध्ये अपघात, ९ जणांचा मृत्यू 


२१ फेब्रुवारी रोजी तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यात दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला होता. मृतकांपैकी चारजण हे एकाच परिवारातील होते.