Term Life Insurance : तुम्ही अजूनही विमा काढला नाहीत? ...मग तुमच्या खिशाला लागणार कात्री
तुम्ही जर टर्म इन्शुरन्स ( Term Insurance ) काढणार असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण कोरोना महामारीमुळे (Corona) झालेल्या अनेक दुष्परिणामांमध्ये आता टर्म इन्शुरन्सचाही समावेश होऊ शकतो.
मुंबई : तुम्ही जर टर्म इन्शुरन्स ( Term Insurance ) काढणार असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण कोरोना महामारीमुळे (Corona) झालेल्या अनेक दुष्परिणामांमध्ये आता टर्म इन्शुरन्सचाही समावेश होऊ शकतो.
तुम्ही जर अजूनपर्यंत टर्म इन्शुरन्स काढला नसेल, आणि आता काढण्याच्या विचारात असाल, तर तुमच्या खिशाला फटका बसणार आहे, कारण त्यासाठी भराव्या लागणाऱ्या प्रिमियममध्ये (insurance premium) कमालीची वाढ होणार आहे.
2021 मध्ये काही Term Insurance चे प्लॅन बदलण्यात आले आहेत, ज्याच्या सुधारित किंमती या 25 ते 30 टक्क्यांनी अधिक आहेत. प्रिमियमही 10 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनच्या (lockdown) काळात जगभरात विमा कंपन्यांचं झालेलं नुकसान, कोरोना झाल्यानंतरचे होणारे आजार आणि सहव्याधी (comorbidity) वाढण्याचा धोका यांसारखी कारणं प्रिमियम वाढवण्यामागे असू शकतात. शिवाय जगभरातील विमा कंपन्यांचा विचार केला, तर भारतामध्ये सर्वात कमी पैसे मोजले जायचे.
प्रिमियम वाढवण्याचा कुणा-कुणाचा विचार?
टाटा एआयए, मॅक्स लाईऱ, अगॉन लाईफ, इंडिया फर्स्ट, पीएनबी मेटलाईफ यांसारख्या 5 कंपन्यांनी पैसे वाढवण्याबाबत विचार सुरू केलाय, आणि तसा प्रस्ताव इन्शुरन्स रेग्युलेटर अथॉरिटीकडेही पाठवला आहे.
कुणाला याचा सर्वाधिक फटका बसेल?
जे आता नव्यानं टर्म इन्शुरन्स काढण्याच्या विचारात असतील
सहव्याधी असणारे रुग्ण, धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती
कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्ती
स्वयंरोजगार निर्मिती करणारे, ज्यांच्याकडे कर पुरावे नाहीत