Heatwave in UP:  उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट आली आहे. उष्णतेचा कहर वाढला आहे. उष्माघातामुळे झालेल्या मृतांचा आकडा वाढल्याने परिस्थिती अधिक भयानक  झाली आहे. उष्माघातने 3 दिवसांत 100 जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रण अलर्ट मोडवर आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने बैठव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात दिवसाचे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. 
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्णतेची लाट आली आहे. उष्माघातामुळे 100 जणांचा मृत्यू झाला आहे. 600 हून अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशात उष्णतेच्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यामुळे योगी सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी प्रशासन आणि अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात ठिकठिकाणी प्याऊ (पिण्याच्या पाण्याचे स्टॉल) लावावेत. रस्त्यांवर पाणी शिंपडावे. उष्माघात टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी. यासोबतच भटक्या प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. 


प्रियांका गांधी यांनी केली भरपाईची मागणी 


उत्तर प्रदेशात उष्माघातमुळे जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याने विरोधकांनीही योगी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उष्णतेच्या लाटेमुळे जीव गमावलेल्या कुटुंबांना भरपाई देण्याची मागणीही केली आहे. उष्माघाताच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी केला आहे. 


5 जूनला 23 जणांचा मृत्यू


उत्तर प्रदेशात आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधित फटका हा बलिया जिल्ह्याला बसला आहे. 15 ते 17 जून या तीन दिवसांत  400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी फक्त  जिल्हा रुग्णालयातील आहे. खाजगी रुग्णालयातील तपशील समोर आलेला नाही.  संपूर्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये देकील अशा प्रकारे रुग्ण दाखल झालेले असावेत अशी शंका देखील उपस्थित केली जात. दरम्यान, उष्माघातामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होणे शक्य नाही. यामुळे यामागे वेगळे कारण देकील असू शकते अशी शंका आरोग्य यंत्रणेने उपस्थित केली असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.