AK-47 रायफल घेऊन फरार झाला भारतीय लष्कराचा जवान
जम्मू काश्मीरात भारतीय लष्कराच्या कॅम्पमधून एक जवान हत्यारांसह फरार झाला आहे.
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरात भारतीय लष्कराच्या कॅम्पमधून एक जवान हत्यारांसह फरार झाला आहे.
कश्मीरमधील पुलवामा येथे टेरिटोरिअल आर्मीतील जवान जहूर अहमद ठाकूर याने एके -४७ आणि तीन मॅगझीन घेऊन पलायन केले आहे. ही घटना बारामुला येथील गंटमुला येथील कॅम्पमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जहूर लष्करातील युनीटच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. त्याला शोधण्यासाठी लष्कराने पाऊले उचलली आहे.
जहूर ठाकूर रात्री पळून गेला. ठाकूर पुलवामा येथे राहणारा आहे. त्याच्या शोधात पोलीस सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
अधिकाऱ्यांनी ठाकूर फरारी झाल्याच्या सूचना दिल्या असून सुरक्षा रक्षकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाकूर दहशतवाद्यांची हात मिळवणी करण्याची शक्यता असल्याचे खबरदारीचे उपाय केले गेले आहेत.
पोलिसांनी अज्ञान ठिकाणी आणि घरांमध्ये त्याचे सैनिक पाठवले असून त्याच्या शोधासाठी मोहिम उघडली आहे. विशेष म्हणजे पुलवामा हा दहशतवाद्यांचा बाल्लेकिल्ला मानला जातो. त्यामुळे धोका वाढला आहे.