Election 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) आता विधानसभा निवडणुकांवर (Vidhansabha Election 2024) सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण, लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्या निवणुकीकडे पाहिलं जातं त्याच निवडणुकीवर दहशतवाद्यांचं सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळं आता सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार (Jammu and Kashmir Election 2024) जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असून, त्यामुळं केंद्र सरकारनं तताडीनं हालचाली सुरू केल्या आहेत. याच धर्तीवर सदर भागामध्ये लष्कराची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. सध्या या भागामध्या प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर लक्ष ठेवलं जात असून, संरक्षण यंत्रणा इथं शोधमोहिमाही हाती घेताना दिसत आहेत. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weathr Updates : सकाळी ऊन, दुपारी ढगांची दाटी अन् रात्री पाऊस; पाहा राज्यातील हवामानाचा नेमका अंदाज 


कोणकोणत्या भागांना सतर्कतेचा इशारा? 


जम्मू काश्मीरमधील किश्तवाड आणि डोडा भागामध्ये सध्या लष्कराचे 5 ते 6 हजार अतिरिक्त जवान तैनात करणअयात आले आहेत. इथं लष्कराची सशस्त्र पथकं तैनात करण्यात आली असून, या भागातील अनेक छुप्या क्षेत्रांवरही लष्कर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवत असल्याचं कळत आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या हवाल्यानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दहशतवादी सामाजिक कार्यकर्ते, पर्यटक, काश्मिरी पंडित आणि उत्तर प्रदेश- बिहारमधील नागरिकांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळं या भागांमध्ये अतिदक्षतेनं लष्कर पावलं टाकल आहे.