नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तीन हल्ले केले. दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील द्रुबगाम गावच्या महिलेची गोळी मारून हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा क्षेत्रातील काजलू गावात शोध पथकातील आर्मी जवान शहीद झाला. शुक्रवारी सकाळी आर्मी जवानांनी दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर हा प्रकार घडला. अवंतिपुरामध्ये एका पोलीस प्रतिष्ठानवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात चार नागरिक जखमी झाले.


महिला मृत्यूमुखी 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरच्या पुलवामात हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी एका महिलेची गोळी मारून हत्या केली. शमीना बानो असं मृत महिलेच नावं असून ती क्विल येथे राहणारी होती. तिला उपचारासाठी हॉस्पीटलला नेण्यात आलं तेव्हा  डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.


जवान शहीद 


भारतीय जवानाची शोध मोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये जखमी झालेल्या जवानाला सेनेच्यया ९२ बेस हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं पण जवान शहीद झाला. राम बाबू सहाय अशी जवानाची ओळख सांगण्यात येत आहे.